राज्यात मॉन्सूनचे आगमन ८ ते १० जून दरम्यान होण्याची शक्यता

राज्यात मॉन्सूनचे आगमन ८ ते १० जून दरम्यान होण्याची शक्यता

 राज्यात मॉन्सूनचे आगमन ८ ते १० जून दरम्यान होण्याची शक्यता

पुणे, ता. २६ - केरळमध्ये दाखल होण्यासाठी वातावरण अद्याप पूर्णपणे अनुकूल झालेले नाही. पुढील चार दिवसांत वातावरण पोषक झाल्यास मॉन्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. राज्यात मॉन्सूनचे आगमन ८ ते १० जून दरम्यान होण्याची शक्यता आहे, अनुकूल परिस्थिती निर्माण होताच मॉन्सून आगमनाबाबत अधिकृत माहिती दिली जाईल, अशी माहिती हवामान विभागप्रमुख एस. डी. सानप यांनी दिली.

सानप यांनी सांगितले की, मॉन्सून सध्या अरबी समुद्रातून श्रीलंका मार्गे अंदमान-निकोबारपर्यंत पोहोचला आहे. तो केरळमध्ये दाखल होण्यासाठी अद्याप वातालरण अनुकूल नाही. पुढील चार दिवसांत वातावरण पोषक झाल्यास मॉन्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो.

विदर्भात पुढील दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात उष्णतेची लाट तसेच काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. २८ मेनंतर विदर्भातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोवा या भागांत तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories