मोरवाडी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तयार होणार रिक्षांसाठी स्वतंत्र मार्गिका....'Rickshaw Bay'

मोरवाडी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तयार होणार रिक्षांसाठी स्वतंत्र मार्गिका....'Rickshaw Bay'

 मोरवाडी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तयार होणार रिक्षांसाठी स्वतंत्र मार्गिका....'Rickshaw Bay'

पिंपरी, ता. २६ - मोरवाडी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असल्याने या परिसरात रिक्षांसाठी स्वतंत्र मार्गिका म्हणजे Rickshaw Bay तयार केली जाणार आहे.  सोमवारी (ता. २५) महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी एकत्रित पाहणी करुन यासाठी जागा निश्‍चित केली आहे. 

मोरवाडी चौकात रीक्षाचालकांची बेशिस्त फार वाढली आहे. चौकात आणि चौकाच्या आजूबाजूला हे रिक्षाचालक अस्ताव्यस्तपणे रीक्षा उभ्या करतात, रस्त्याच्या अगदी मध्यापर्यंत रीक्षा उभारलेल्या असतात. त्यांच्यामुळे, चौकात वाहतूक कोंडी होते. पादचाऱ्यांना चालायलाही जागा राहात नाही. मोरवाडी चौकात या रिक्षाचालकांची अरेरावी पाहायला मिळते. या बेशिस्तपणाला आळा घालण्यासाठी Rickshaw Bay प्रभावी ठरणार आहे. 

महापालिकेच्या नियोजनानुसार, पिंपरी ते चिंचवड, चिंचवड ते पिंपरी, मोरवाडी ते पिंपरी आणि पिंपरी ते मोरवाडी या मार्गांवर विशेष रिक्षा मार्गिका बांधण्याचे नियोजन आहे. याबाबत, बोलताना पिंपरी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक अमित डोळस म्हणाले की, ''सोमवारी मोरवाडी चौकाची पाहणी केली आहे. त्याचा अहवाल मंजुरीसाठी आरटीओ प्रशासनाला पाठवणार आहे. आरटीओची मान्यता मिळाल्यानंतर त्या ठिकाणी ‘रिक्षा-बे’ सुरु करण्यात येईल.'' 

Rickshaw Bay - म्हणजे प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षा किंवा ई-रिक्षांसाठी रस्त्यावर, बस स्थानकाजवळ किंवा मेट्रो स्टेशनबाहेर तयार केलेले एक अधिकृत थांबे क्षेत्र (Pick-up and Drop-off Zone) असते. या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे, रिक्षा वाहतूकीला शिस्त लागते.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories