पुणे शहर / जिल्हा
स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेचे काम सुरु, मेट्रो'ने उभारले तात्पुरते बस थांबे
स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेचे काम सुरु, मेट्रो'ने उभारले तात्पुरते बस थांबे
पुणे, ता. 25 - स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे पीएमपीच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. मेट्रो प्रशासनाकडून या मार्गावरील बी आर टी बस थांब्यांच्या समोर तात्पुरते बस खांबे उभारण्यात आले आहेत.
उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या बस थांबांवर शेड आणि आसन व्यवस्था केलेली असल्याने येणाऱ्या पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय काही प्रमाणात टळणार आहे.
या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी आणि मेट्रो प्रशासनाला सहकार्य करावे, असे महामेट्रो प्रशासनाने म्हटले आहे.