''अधिकारी-नेते आम्हाला नेमकं काही सांगत नाहीत'', ''या अपघाताला जबाबदार कोण ?'', ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या कुटुंबियांचा अधिकाऱ्यांना संतप्त प्रश्न

''अधिकारी-नेते आम्हाला नेमकं काही सांगत नाहीत'', ''या अपघाताला जबाबदार कोण ?'', ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या कुटुंबियांचा अधिकाऱ्यांना संतप्त प्रश्न

मोशी कचरा डेपो दुर्घटना अपडेट - 

''अधिकारी-नेते आम्हाला नेमकं काही सांगत नाहीत'', ''या अपघाताला जबाबदार कोण ?'', ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या कुटुंबियांचा अधिकाऱ्यांना संतप्त प्रश्न

पिंपरी, ता. ११ जुलै २०२६ - मोशीतील कचरा डेपो इमारत दुर्घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली 23 जण अडकले होते. 15 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही 8 जण स्लॅब खाली अडकले आहेत. अडकलेल्या कामगारांचे कुटुंबीय आपल्या माणसाला पाहण्यासाठी त्या ढिगाऱ्याकडे डोळे लाऊन बसले आहेत. मात्र, प्रशासनाला अपयश येत असल्याने हतबल झालेल्या कुटुंबियांनी रात्री उशिरा त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना घेराव घातला, त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. या अपघाताची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त प्रश्न विचारला आहे. 

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचे कुटुंबिय गेले तीन दिवस घटनास्थळी थांबले आहेत. प्रशासनाच्या हरेक शब्दाकडे कान लाऊन बसले आहेत. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत आहेत. मात्र, तीन दिवसांनंतरही काहीच आशादायक बातमी त्यांच्या कानावर पडेनाशी झालीये. अधिकारी, लोकप्रतिनिधी येतात, आढावा घेतात आणि फोटो काढून जातात. हा प्रकार पाहताना त्या नातेवाईकांच्या जीवाची प्रचंड तळमळ होताना दिसतेय. 

ज्या ठिकाणी आमची माणसं अडकली आहेत, तिकडचा कचऱ्याचा ढिगारा तसाच आहे, असे नातेवाईकांनी सांगितले. अतिक्रमणं पाडायला मोठी यंत्रणा आणतात मग इथं माणसांचे जीव धोक्यात असताना तातडीने तशी यंत्रणा का आणली नाही, अधिकारी आणि नेते आम्हाला काही नेमकं सांगत नाहीत, या इमारतीला भेगा पडल्या होत्या. आम्ही ते फोटो घटना घडण्याच्या आधी दोन दिवस संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले होत्या. त्यावर का उपाययोजना करण्यात आल्या नाही, कचऱ्याचा ढीग किती उंचीपर्यंत असावा याबाबतच्या नियमाचे पालन का झाले नाही, चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा....या बाबींची उत्तरं कामगारांच्या कुटुंबियांना हवी आहेत आणि अद्याप ती मिळालेली नाहीत. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories