कुंपण घालण्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला ; बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल

कुंपण घालण्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला ; बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल

पुणे : मुळशीत कुंपण घालण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणावर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांत बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी 1 च्या सुमारास मारुंजी परिसरातील शिवारवस्ती येथे ही घटना घडली.जमिनीला तारेचे कुंपण घालण्यावरून सौरव बुचडे (वय २८, रा. मारुंजी) याच्या धारधार लोखंडी हत्याराने वार करत मारहाण करून जखमी करण्यात आले.

तक्रारीनुसार, सौरव बुचडे यांना त्यांच्या जमिनीला तारेचे कुंपण घालायचे होते. यासाठी त्यांनी शेजारील मिळकतधारक संभाजी बुचडे यांना बोलावले होते. त्यावेळी संभाजी बुचडे आपला मुलगा शेखर बुचडे याच्यासह घटनास्थळी आले. 

यावेळी झालेल्या वादातून संभाजी बुचडे यांनी सौरवला हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे. तर शेखर बुचडे याने धारदार लोखंडी हत्याराने डोक्यावर आणि छातीवर वार करून सौरवला जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर सौरव बुचडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानुसार, संभाजी बुचडे आणि त्यांचा मुलगा शेखर बुचडे (दोघेही रा. मारुंजी) 

त्यानुसार संभाजी बुचडे आणि त्यांचा मुलगा शेखर संभाजी बुचडे (दोघेही रा. मारुंजी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कांदे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories