पुणेकरांनो, लक्ष द्या! सुस ब्रिज-चांदणी चौक परिसरात वाहतुकीत बदल

पुणेकरांनो, लक्ष द्या! सुस ब्रिज-चांदणी चौक परिसरात वाहतुकीत बदल

पिंपरी : व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी 21 नोव्हेंबर 2026 रोजी सुस ब्रिज ते सिम्बायोसिस कॉलेज, लवळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त विक्रांत देशमुख यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.

या अधिसुचनेनुसार, शनिवारी 21 नोव्हेंबर रोजी व्हीव्हीआयपी व्यक्ती पुण्याहून सुस ब्रिजमार्गे सिम्बायोसिस कॉलेज, लवळे येथे जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान सुस ब्रिज ते सिम्बायोसिस कॉलेज या मार्गावरून व्हीव्हीआयपींची ये-जा होणार आहे. 

व्हीव्हीआयपींच्या मार्गात कोणतेही वाहन आल्याने धोका निर्माण होऊ नये, यासाठी या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुचनेनुसार, सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे वाहतूक निर्बंध लागू राहतील असे, पोलिस उपआयुक्तांनी सांगितले. 

त्यानुसार सुस ब्रिजवरून सिम्बायोसिस कॉलेज, लवळे येथे जाणाऱ्या आणि तेथून सुस ब्रिजकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूक प्रतिबंध लागू राहणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करवा, असे आवाहन करण्यात आले आहे. मोटार वाहन कायदा कलम 115, 116(1) (अ) (ब), 116(4) आणि 117 अन्वये हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

पोलिस उपआयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार, सुस ब्रिज येथून राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी नानावरे अंडरपास, बिडवाई कंपनी आणि बावधन सर्व्हिस रोड या मार्गाचा वापर करावा, तर गोडुंबेवाडीकडे जाणाऱ्या वाहनांनी चांदणी चौक, भुगाव, पिरंगुट, घोटावडे फाटा मार्गे जावे. तसेच चांदे नांदेडकडून हिंजवडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी नांदे येथील उजवीकडे वळून डी.टी.पी. सर्कलमार्गे प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories