घराचे दार उघडे असताना १८ लाखांचे दागिने लंपास, चोरट्याला अटक
पिंपरी, ता. २३ - घराचे दार उघडे असल्याचा गैरफायदा घेत एकाने १८ लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले. ही घटना ११ ते २० मे २०२६ या कालावधीत नवलेवस्ती-ताथवडे येथे घडली आहे. आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत, सुखदेव दिनकर पवार (वय-५४ वर्षे, शेती, रा. नवलेवस्ती, ताथवडे) यांनी तक्रार दिली. आरोपी सचिन भगवान सहजराव (वय ४३ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. तो पवार वस्ती-ताथवडे येथील रहिवासी आहे. आरोपीने फिर्यादी सुखदेव पवार यांच्या घराचे दार उघडे असल्याचा गैरफायदा घेत पवार यांच्या घरात प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले १८ लाख रुपये किंमतीचे २२.५ तोळे वजनाचे दागिने चोरुन नेले. आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
त्याच्यावर वाकड पोलिस ठाण्यात वाकड भारतीय न्याय संहिता कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.