अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकावी, अन्यथा कारवाई - मंत्री प्रताप सरनाईक

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकावी, अन्यथा कारवाई - मंत्री प्रताप सरनाईक

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकावी, अन्यथा कारवाई - मंत्री प्रताप सरनाईक 

परिवहन विभागाद्वारे रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा विनामूल्य शिकण्याची व्यवस्था 

पुणे, ता. २३ - ''रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.'', असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांना दिला.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात शुक्रवारी (ता. २३) बैठक घेतली. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर व अन्य संबंधित उपस्थित होते. या बैठकीत सरनाईक यांनी ही सूचना व माहिती दिली. 

सरनाईक म्हणाले, ''मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच, रिक्षा संघटना आणि शिवसेना शाखांमधील उपलब्ध जागांमध्येही ही केंद्रे १५ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहेत. रिक्षा-टॅक्सी चालकांनी या उपक्रमात सहभागी होऊन यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्यांना परिवहन विभागामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी चालकांची मराठी भाषेवरील व्यवहारिक क्षमता तपासण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांमध्ये तोंडी परीक्षा घेतली जाणार जाणार आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांनी ऑनलाईन किंवा आपल्या परिसरातील प्रत्यक्ष केंद्रांमध्ये जाऊन मराठी भाषा शिकून घ्यावी.''

''या प्रशिक्षणात सुमारे चार हजार शिक्षक सहभागी होणार असून, प्रत्येक महिन्यातील चार शनिवार आणि रविवार चालकांच्या सोयीप्रमाणे किमान चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांनी विनामूल्य उपलब्ध असलेले ऑनलाईन अथवा ऑफलाईन प्रशिक्षण घेऊन व्यावहारिक मराठी आत्मसात करावी. '', असे सरनाईक यांनी सांगितले. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories