जागतिक पर्यावरण दिनी दुर्गा टेकडीवर महापालिका लोकसहभागातून राबवणार 'वृक्षारोपण अभियान'

जागतिक पर्यावरण दिनी दुर्गा टेकडीवर महापालिका लोकसहभागातून राबवणार 'वृक्षारोपण अभियान'

जागतिक पर्यावरण दिनी दुर्गा टेकडीवर महापालिका लोकसहभागातून राबवणार 'वृक्षारोपण अभियान' 

पिंपरी, ता. २३ -  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी सकाळी ७ वाजता दुर्गा टेकडी येथे लोकसहभागातून १००० झाडांचे भव्य 'वृक्षारोपण अभियान' राबविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका लोकसहभागातून हा उपक्रम राबवत आहे.

निगडी-प्राधिकरणातील दुर्गादेवी टेकडी जैवविविधनतेने नटलेली आहे. वर्षानुवर्षे शहरवासिय मोठ्या संख्येने टेकडीवर निसर्ग अनुभवण्यासाठी येतात. या हिरवाईमध्ये  दुर्गादेवीच्या मंदिरातही असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. अतिशय सुंदर अशा या दुर्गाटेकडी हिरवाईने आणखी समृद्ध करण्यासाठी यंदा पर्यावरण दिनानिमित्त तिथे महापालिका लोकसहभागातून वृक्षारोपण करणार आहे. नागरीकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

या उपक्रमाच्या नियोजनासंदर्भात आज बैठक पार पडली. यावेळी मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, उपायुक्त सिताराम बहुरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.वृक्षारोपण उपक्रमाचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल.  





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories