नैसर्गिक नाला बुजवल्याबाबत पुणे महापालिकेची पोलिसांना नोटिस
पुणे, ता. २२ - चतुश्रृंगी टेकडीवरुन जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून नैसर्गिक नाला बुजवून त्यावर बांधकाम करणाऱ्या जिल्हा पोलिसांना महापालिका नोटिस बजावणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बाणेर रस्त्यावरील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातून अभिमानश्री सोसायटीकडून बाणेर रस्त्याच्या दिशेने जाणारा वाहणारा हा नैसर्गिक नाला बुजवून तेथे बांधकाम सुरु केले आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात नाल्यात कचरा अडकल्याने नाल्याचे पाणी अभिमानश्री सोसायटी व लगतच्या सोसायट्यांमधील बंगल्यांमध्ये शिरले होते. याबाबत तक्रार केल्यानंतर पालिका प्रशासनाने नाल्याची सफाई केली होती. जिल्हा पोलिसांनी पुन्हा नाला बजुवला आहे, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.