क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ३० जुलै २०२६

क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ३० जुलै २०२६

क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ३० जुलै २०२६ 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 बॅंक खात्याचा वापर सायबर फसवणुकीसाठी केल्याप्रकरणी खातेदारांवर गुन्हा दाखल

➡️ चिंचवड - बॅंकेत खाते उघडून त्याचा वापर सायबर फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी केल्याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात एका खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार एस. एस. सोनपेटे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी खातेदाराचे नाव सोनु रामधनी वर्मा (रा. मोरया कॉलनी, ताथवडे) आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर २०२४ ते १६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत बिजलीनगर येथील एका बँकेत आरोपीने खाते उघडून साथीदारांशी संगनमताने फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी त्या खात्याचा वापर केला.  या खात्यामार्फत देशातील दोन नागरिकांकडून ऑनलाइन फसवणुकीतून एकूण १८ लाख ६३ हजार ६६७ रुपये जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीवर चिंचवड पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २९) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६१(२), ३१८(४), ३१७(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


➡️ चिंचवड - बँकेतील खात्याचा वापर करून ऑनलाइन फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारात सहभागी झाल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित खात्यातून दोन नागरिकांची ८५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात पोलीस हवालदार एस. एस. सोनपेटे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल दिलीप ससाने (रा. बाबासाहेब आंबेडकरनगर, खराडी रोड, पुणे) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६१ (२), ३१८ (४), ३१७ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बिजलीनगर, चिंचवड येथील बँकेत खाते उघडले होते. त्यानंतर साथीदारांसोबत संगनमत करून फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी या खात्याचा वापर केल्याचे समोर आले आहे. या खात्यावर भारतातील दोन नागरिकांकडून फसवणुकीद्वारे ८५ हजार रुपये जमा झाल्याचे तपासात आढळून आले.

ही घटना १९ मे २०२५ रोजी सकाळी आठ ते रात्री अकरा या कालावधीत घडल्याचे नमूद आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.


➡️ निगडी - ऑनलाइन आर्थिक फसवणूक प्रकरणात निगडी पोलिसांनी सौरभ मधुकर जवरे (रा. बिजलीनगर, चिंचवड गाव) याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११२ (२), ६१ (२), ३१८ (४) आणि ३ (५) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सौरभ जवरे याने आकुर्डी येथील बॅंकेत उघडले होते. त्याने इतर साथीदारांसोबत संगनमत करून या खात्याचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी केला. या खात्यावर एकूण १ लाख ७० हजार ७५२ रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या व्यवहारांमध्ये भारतातील दोन नागरिकांच्या तक्रारीतील एकूण ६५ हजार ७८४ रुपयांची रक्कम या खात्यावर जमा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात २९ जुलै २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 लेबर कॅम्पमध्ये वादातून कामगाराचा खून; आरोपीचाही उपचारादरम्यान मृत्यू

शिंदे गाव (ता. खेड) येथील युनिटी बिल्ड टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये झालेल्या वादातून एका कामगाराचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २८) गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्ला करणाऱ्या आरोपीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी कंपनीचे सुपरवायझर रविंद्र विलास पवार (रा. वडमुखवाडी, चऱ्होली, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमरूष उरानो (वय ४३, रा. महाकालगुरी, समुक्ताला, जि. जालपैगुरी, पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास शिंदे गाव येथील कंपनीच्या लेबर कॅम्पमधील पत्र्याच्या खोलीत आरोपी अमरूष उरानो आणि चिरंजीत बसूमातो (वय ३७, रा. अलिपुरद्वार, जि. जालपैगुरी, पश्चिम बंगाल) यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यावेळी आरोपीने खोलीतील लाकडी पाटाने चिरंजीत यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान चिरंजीत यांचा मृत्यू झाला. या झटापटीत आरोपीही गंभीर जखमी झाला होता. त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 पिंपरीत जुगार अड्ड्यावर छापा; सात जणांवर कारवाई, ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

 रमाबाई नगर परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पिंपरी पोलिसांनी छापा टाकून सात जणांवर कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण ४३ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई २९ जुलै रोजी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास रमाबाई नगर, पिंपरी येथे करण्यात आली. आरोपी विलास सेटेप्पा कांबळे (वय ४१), मनोहर मोशे गवई (वय ३८), अनिल मल्लाप्पा वासमानी (वय ३२), भीमा महादेव कांबळे (वय ३२), विलास हुसनाप्पा चलवादी (वय ३८), विजय परमेश्वर पांडागळे (वय ३३) आणि बसवराज लक्ष्मण सोनकांबळे (वय ६१, सर्व रा. रमाबाई नगर, पिंपरी, पुणे) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यांच्याकडून ८ हजार २० रुपये रोख रक्कम, १३ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

याप्रकरणी पोलीस शिपाई आनंद भगवान बजबळकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५ (३) (६) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भारती करीत आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 वाकडमध्ये चाकू हल्ल्यात तरुण जखमी

 किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने वार करून जखमी केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राहुल संदिपान जोगदंड (वय ३७, रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवि विक्रम जाधव (वय ३६, अंदाजे रा. पंचशील कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास चौधरी पार्क, ब्रह्मा सोसायटीसमोर, वाकड येथे फिर्यादी राहुल जोगदंड हे चंपक जाधव व वशिष्ठ कांबळे यांच्यासोबत गप्पा मारत उभे होते. त्यावेळी आरोपी रवी जाधव याने कोणतेही कारण नसताना फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

वराळे ते नवलाख उंब्रे मार्गावर एल अँड टी कंपनीसमोर भरधाव बसने दुचाकीला धडक दिल्याने दोघे जखमी झाले. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास नवलाख उंब्रे (ता. मावळ) येथील एल अँड टी कंपनीसमोर घडली. याबाबत अजित माणिकराव इटाळे (वय ३०, रा. श्रमसाफल्य सोसायटी, शिवाजी चौक, तळेगाव, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजित इटाळे हे मित्र अनिकेत प्रमोद चंदने यांच्यासोबत अॅक्टिव्हा दुचाकी (क्रमांक एमएच ४९ ए.क्यू. ६८११) वरून वराळे ते नवलाख उंब्रे मार्गावरून जात होते. एल अँड टी कंपनीसमोर रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला जात असताना नवलाख उंब्रेच्या दिशेने येणाऱ्या बस (क्रमांक एमएच १२ आरएन ०५०३) चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने बस चालवून दुचाकीला धडक दिली.

या अपघातात अजित इटाळे यांच्या डाव्या डोळ्याजवळ, गालावर व डाव्या हाताच्या पंजाला दुखापत झाली. तसेच अनिकेत चंदने यांच्या डोक्याला, छातीला व बरगडीला गंभीर दुखापत झाली.

याप्रकरणी बसचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व १३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 रावेतमध्ये बांधकाम साईटवरून ७५ हजारांच्या अॅल्युमिनियम प्लेट चोरी; दोघांना अटक

 रावेत येथील स्काय एलिगन्स बांधकाम साईटवरून ७५ हजार रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम प्लेट चोरी केल्याप्रकरणी रावेत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सचिन नानाभाऊ देवकर (वय ३२, रा. मंगल अॅपार्टमेंट, चंद्रभागा कॉर्नर, रावेत, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ते २८ जुलै २०२६ दरम्यान एस. बी. पाटील रोड, लक्ष्मीनगर, रावेत येथील स्काय एलिगन्स साईटवरून अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय १५ अॅल्युमिनियम प्लेट चोरून नेल्या.

या प्लेटची किंमत सुमारे ७५ हजार रुपये आहे. याप्रकरणी तपास करताना पोलिसांनी प्रेम राकेश वाल्मीकी (वय २१, रा. पत्रा शेड झोपडपट्टी, लिंक रोड, चिंचवड) व स्वप्निल शंकर कुडवे (वय २४, रा. पत्रा शेड झोपडपट्टी, लिंक रोड, चिंचवड) या दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories