दुकानदारांनी येत्या १५ दिवसांत पदपथांवरील अतिक्रमणे हटवावीत - डॉ. विजय सूर्यवंशी

दुकानदारांनी येत्या १५ दिवसांत पदपथांवरील अतिक्रमणे हटवावीत - डॉ. विजय सूर्यवंशी

दुकानदारांनी येत्या १५ दिवसांत पदपथांवरील अतिक्रमणे हटवावीत - डॉ. विजय सूर्यवंशी

पिंपरी, ता. २६ -  ‘‘पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी असतात. त्यामुळे संबंधित दुकानधारकांनी त्यावरील अतिक्रमणे येत्या १५ दिवसांत कायमस्वरुपी हटवावीत. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल’’, असा इशारा महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी क्षेत्रीय कार्यालयनिहाय अतिक्रमण कारवाईच्या कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, प्रेरणा सिनकर, मनोज सेठिया, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, उपआयुक्त सचिन पवार, डॉ. प्रदीप ठेंगल आदींसह क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. 

अनेक दुकानदार जाणीवपूर्वक दुकानासमोरचे क्षेत्र वाढवून अनधिकृतपणे अतिक्रमण करतात. याशिवाय दुकानांसमोर साहित्य देखील ठेवतात. शहरातील उपनगरांमध्ये सर्रासपणे हेच चित्र पाहायला मिळते. त्यामुळे पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने पदपथावरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयनिहाय जागा निश्चित करुन हॉकर्स झोन तयार करावा पथारी विक्रेत्यांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी सर्व क्षेत्रीय कार्यालयनिहाय फिरते पथक नेमावे अतिक्रमणांवर सातत्याने देखरेख ठेवावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories