महापालिकेच्या मोरवाडी 'आयटीआय'मधील विद्यार्थ्यांचे बारावी समकक्ष परीक्षेत उत्तम यश

महापालिकेच्या मोरवाडी 'आयटीआय'मधील विद्यार्थ्यांचे बारावी समकक्ष परीक्षेत उत्तम यश

महापालिकेच्या मोरवाडी 'आयटीआय'मधील विद्यार्थ्यांचे बारावी समकक्षता परीक्षेत उत्तम यश  

पिंपरी, ता. २६ -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) निकाल ८४.५१% लागला आहे. परीक्षेला बसलेल्या एकूण ७१ विद्यार्थी पैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) व्यवसायिक अभ्यासक्रम बारावीच्या समकक्ष केले आहेत. यामध्ये मराठी व इंग्रजी हे विषय  उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. 

 संस्थेतील ऋषिकेश आंबावले (मोटार मेकॅनिकल ट्रेड) ८१.६७ % गुण मिळवून संस्थेत प्रथम क्रमांक पटकवला आहे. सार्थक कुमकर ( मोटार मेकॅनिकल ट्रेड) ७८.५० % गुण मिळवून द्वितीय आणि  निशित सुरवसे (मोटार मेकॅनिकल ट्रेड) ७४.५० % याने गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांना प्राचार्य शशिकांत पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या पुढील वाटचालीस सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यशस्वी विद्यार्थ्यांना निदेशक अमोल शिंदे, गटनिदेशक( सेवानिवृत्त) राजकुमार तिकोणे  यांनी मार्गदर्शन केले.  निदेशक विक्रम काळोखे, मुख्य लिपिक विजय भैलुमे व लिपिक विजय चावरिया यांनी सहकार्य केले. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories