पिंपरी-चिंचवडमधील म्युल बँक खातेधारकांविरोधात एकूण ५ गुन्हे दाखल, संशयास्पद बँक खात्यांची पोलिसांकडून पडताळणी

पिंपरी-चिंचवडमधील म्युल बँक खातेधारकांविरोधात एकूण ५ गुन्हे दाखल, संशयास्पद बँक खात्यांची पोलिसांकडून पडताळणी

 पिंपरी-चिंचवडमधील म्युल बँक खातेधारकांविरोधात एकूण ५ गुन्हे दाखल, संशयास्पद बँक खात्यांची पोलिसांकडून पडताळणी

सायबर फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे नागरिकांना आवाहन 

पिंपरी, ता. १७ जुलै २०२६ - भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या  नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP)आणि समन्वय पोर्टलवरील (SAMNVAYA Portal) उपलब्ध माहितीचे विश्लेषण करताना पिंपरी चिंचवड पोलीसांनी पिंपरी-चिंचवड परिसरातील संशयास्पद बँक खात्यांची पडताळणी करुन म्युल बँक खातेधारकांविरोधात एकूण ५ गुन्हे दाखल केले आहेत. म्युल खाते म्हणजे असे बँक खाते जे सायबर गुन्हेगारांकडुन फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी किंवा फसवणुकीची रक्कम दुसऱ्या बँक खात्यात पाठविण्यासाठी / रोख स्वरुपात काढण्यासाठी वापरले जाते.

सदरची कारवाई विनयकुमार चौबे, (पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड),  डॉ. शशिकांत महावरकर ९सह पोलिस आयुक्त), सारंग आवाड (अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)),  रोहिदास पवार (पोलिस उपायुक्त (गुन्हे)) आणि रोहिणी बानकर (सहाय्यक पोलीस आयुक्त (आर्थिक व सायबर)) यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाणे, पिंपरी चिंचवड व काळेवाडी पोलिस ठाणे यांनी केली आहे.

सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सायबर गुन्हेगार नागरीकांना कंपनीचे पैसे, गेमिंग फंड, जीएसटी पैसे, सीबील वाढविण्यासाठी लोनचे पैसे बॅंक खात्यात येणार असल्याचे सांगून आरोपी त्यांच्याकडून वेगवेगळया बँकेचे अकाऊंट प्राप्त करतात. नागरीकांनी अमिषाला बळी न पडता स्वतःचे बँक खाते कोणालाही व्यवहार करण्यासाठी देऊ नये. सायबर फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ १९३० हेल्पलाईन वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांचा तपशील -  

१. सायबर पोलिस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक २३/२०२६

तपासादरम्यान YES Bank मधील खाते  संशयास्पद म्युल खाते असल्याचे निष्पन्न झाले. सदर खाते GENIUS ENTERPRISES या नावाने प्रदीप अशोक

राठोड, रा. चिंचवड, पुणे यांच्या नावावर असल्याचे आढळले. तपासात असे उघड झाले की, केवळ ११ दिवसांच्या कालावधीत या खात्यात ९३,६२,२५७/- रु इतकी संशयास्पद रक्कम प्राप्त झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नमूद बँक खात्या विरोधात सायबर फसवणूकीच्या १३ तक्रारी नोंद आहेत.


२. सायबर पोलिस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक २५/२०२६

बँक ऑफ महाराष्ट्र मधील खाते म्युल खाते असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर खाते ABHIJIT WEB DEVELOPER या नावाने अभिजीत विकास चव्हाण (वय २६ वर्षे), रा. देहूरोड, पुणे यांच्या नावावर असल्याचे आढळले. या खात्याच्या तपासात ५४,६२,५५३/- रु इतकी संशयास्पद रक्कम प्राप्त झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नमूद बँक खात्या विरोधात सायबर फसवणूकीच्या २ तक्रारी नोंद आहेत.


३. सायबर पोलिस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक २६/२०२६

बँक ऑफ महाराष्ट्र मधील खाते म्युल खाते असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर खाते Salve DEVELOPER या नावाने सागर रमेश साळवे (वय ३१ वर्षे), रा. पिंपरी, पुणे यांच्या नावावर असल्याचे आढळले. या खात्याच्या तपासात १६,९७,७५०/- रु इतकी संशयास्पद रक्कम प्राप्त झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद बँक खात्या विरोधात सायबर फसवणूकीच्या ७ तक्रारी नोंद आहेत.


४. सायबर पोलिस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक २७/२०२६

बँक ऑफ महाराष्ट्र मधील खाते म्युल खाते असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर खाते राहुल रामा राठोड, वय २८ वर्षे, रा. चिंचवड, पुणे यांच्या नावावर असल्याचे आढळले. या खात्याच्या तपासात 34,37,815/- रु इतकी संशयास्पद रक्कम प्राप्त झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नमूद बँक खात्या विरोधात सायबर फसवणूकीच्या ७ तक्रारी नोंद आहेत.


५. काळेवाडी पोलिस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक २९९/२०२६

जळगाव जनता सहकारी बँक मधील खाते देखील म्युल खाते असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर खाते प्रेम नंदु लोखंडे (वय १९ वर्षे), रा. थेरगाव, पुणे यांच्या नावावर असल्याचे आढळले. या खात्याच्या तपासात २३,२३.३४१/- रु इतकी संशयास्पद रक्कम प्राप्त झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद बँक खात्या विरोधात सायबर फसवणुकीच्या २ तक्रारी (गुजरात व दिल्ली) नोंद आहेत.


नागरिकांसाठी माहिती - 

 म्युल खाते (Mule Account) म्हणजे काय?

 म्युल खाते म्हणजे असे बँक खाते जे सायबर गुन्हेगारांकडुन फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी किंवा फसवणुकीची रक्कम दुसऱ्या बँक खात्यात पाठविण्यासाठी / रोख स्वरुपात काढण्यासाठी वापरले जाते. अनेक वेळा बँक खातेदारांना कमिशन देऊन किंवा फसवुन त्यांची बँक खाती वापरली जातात.

सध्या सायबर फसवणुकीमध्ये शेअर मार्केट गुंतवणुक, डिजिटल अरेस्ट आणि पार्ट टाईम जॉब याचे प्रमाण जास्त आहे. सायबर गुन्हेगार कधीही स्वतःचे बँक खाते फसवणुकीसाठी वापरत नाहीत. ते सर्वसामन्य नागरीक, विदयार्थी किंवा गरजु लोकांची बँक खाती भाडयाने घेऊन किंवा खरेदी करुन फसवणुकीचा पैसा प्राप्त करतात.


गुन्हेगारांची कार्यपध्दती (Modus Operandi)

१. झटपट पैशांचे अमिष दाखवुन टेलिग्राम, व्हॉटसअॅप किंवा सोशल मीडियाव्दारे विदयार्थी, कमी उत्पन्न असलेले नागरीक आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना कमिशनचे अमिष दाखवुन बँक खाते उघडले जाते.

२. बँक खात्याची खरेदी सायबर गुन्हेगार काही ठराविक रकमेच्या बदल्यात करतात.

३. नागरीकांकडुन त्यांची सक्रिय बँक खाती, इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड, एटीएम कार्ड आणि बँक खात्याशी लिंक असलेले सिमकार्ड खरेदी करतात.

४. सायबर गुन्हेगार नागरीकांकडुन प्राप्त कागदपत्रांच्या आधारे बनावट कंपन्यांची नोंदणी करुन चालु खाती (Current Accounts) उघडली जातात. जेणेकरुन मोठया रकमेचे व्यवहार सहज करता येतील.


- Operation Mule Hunt चे उद्दिष्ट

> म्युल खात्याची ओळख पटविणे.

खातेदार, एजंट आणि रॅकेट चालविणाऱ्या मुख्य आरापींना अटक करणे.

> संशयीत बँक खात्यांवर फ्रिझ/लिन मार्क करणे.

सायबर फसवणुकीतील बँक खात्यावर होणाऱ्या पैशांचा प्रवाह (Money Trail) उघड करणे.

> बँका, आणि राज्य सायबर पोलिसांमध्ये समन्वय वाढवणे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories