पिंपळे गुरवमध्ये घरात घुसून ४० हजारांचा लॅपटॉप लंपास

पिंपळे गुरवमध्ये घरात घुसून ४० हजारांचा लॅपटॉप लंपास

पिंपरी-चिंचवड : पिंपळे गुरव येथील एका घरातून ४० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोतिला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर गयाबापू करडीले (वय ३४, रा. पिंपळे गुरव) यांनी ही तक्रार दिली आहे. शुक्रवारी ( ६ नोव्हेंबर) सकाळी सहा ते साडेसहा या कालावधीत नेताजी नगर, शनी मंदिर रस्ता, काटेपुरम चौक परिसरातील त्यांच्या घरी चोरी झाल्याची नोंद तक्रारीत  आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचा दरवाजा ओढून घेतलेला होता. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील डेल कंपनीचा लॅपटॉप चोरून नेण्यात आला. या लॅपटॉपची किंमत सुमारे ४० हजार रुपये असल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले आहे.

सांगवी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हवालदार गोडे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories