थेरगावात पेपर मिलबाहेर दुचाकी चोरी ; वाकड पोलिसांत गुन्हा दाखल

थेरगावात पेपर मिलबाहेर दुचाकी चोरी ; वाकड पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड : पुण्यात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. थेरगावातील पेपर मिलबाहेर पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश धीरज जाधव (वय २२, रा. रहाटणी) ची होंडा युनिकॉर्न दुचाकी चोरीला गेली आहे. गुरुवारी (५ नोव्हेंबर) ही घटना घडली.

यशने थेरगावातील आदित्य बिर्ला मार्गावर पदमजी पेपर मिलबाहेर रस्त्याच्या फुटपाथलगत असलेल्या पार्किंगच्या जागेत आपली दुचाकी उभी केली होती. मात्र, काम संपवून परत आल्यानंतर दुचाकी जागेवर नसल्याचे यशच्या लक्षात आले. 

आपली बाईक पार्क केलेल्या ठिकाणी नसल्याचे लक्षात येताच त्याने पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. चोरीला गेलेल्या दुचाकीची किंमत ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे. काळ्या रंगाच्या या दुचाकीच्या पुढील बाजूला ‘राम’ असे लिहिलेले आहे.

वाकड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हवालदार भुसारे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories