'पावसाचे साचलेले पाणी काढा', 'पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा'.... घरकुल वसाहतीतील रहिवाशांची रास्ता रोको आंदोलनातून मागणी, आंदोलनानंतर यंत्रणा लागली कामाला

'पावसाचे साचलेले पाणी काढा', 'पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा'....  घरकुल वसाहतीतील रहिवाशांची रास्ता रोको आंदोलनातून मागणी,  आंदोलनानंतर यंत्रणा लागली कामाला

'पावसाचे साचलेले पाणी काढा', 'पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा'....

घरकुल वसाहतीतील रहिवाशांची रास्ता रोको आंदोलनातून मागणी, आंदोलनानंतर यंत्रणा लागली कामाला 

पिंपरी, ता.  ८ जुलै २०२६ - गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे चिखली येथील घरकुल वसाहतीत पाणी शिरले आहे. अजूनही या पाण्याचा निचरा झालेला नाही. वीज नसल्यामुळे घरात पाणी नाही. या परिस्थितीमुळे संतापलेल्या रहिवाशांनी आज, बुधवारी सकाळी (ता. ८) परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

नागरिकांनी सांगितले की, घरासमोर पावसाचे पाणी साचलेले, पण नळात पिण्याचे पाणी नाही, अशी आमची परिस्थिती आहे. दर पावसाळ्यात घरकुल परिसर पावसाच्या पाण्याने भरुन जातो. रहिवाशांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या.  तरीही प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना करत नाही. गेल्या दोन दिवसांपासून घरकुल वसाहतीतील बहुतांश इमारतींमध्ये पाणी साचले आहे, त्यामुळे बाहेर ये-जा करणे अवघड झाले आहे. साचलेल्या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तत्काळ या ठिकाणी भेट देऊन आमचा प्रश्न सोडवावा. 

नागरिकांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली. त्यानंतर, प्रशासनाने हालचाल केली. यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन कामला लागली. नागरिकांनी सकाळी सकाळी केलेल्या या रास्ता रोकोमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories