पुणे जिल्ह्यात १ जूनपासून दळणाच्या दरात वाढ

पुणे जिल्ह्यात १ जूनपासून दळणाच्या दरात वाढ

 पुणे जिल्ह्यात १ जूनपासून दळणाच्या दरात वाढ 

पुणे, ता. २३ -  पुणे शहर जिल्हा पीठ गिरणी मालक संघाने दळणाच्या दरात प्रति किलो दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन दरवाढ एक जूनपासून संपूर्ण जिल्ह्यात लागू होणार आहे.  त्यामुळे दळणाचे दर आता प्रति किलो १० रुपये होणार आहेत. डाळी आणि भाजणीसाठी आता प्रति किलो १५ रुपये दर आकारला जाणार आहे. 

वाढती महागाई, गिरणी साहित्यांतील दरवाढ, वीजबिलांमधील वाढ, कामगारांची पगारवाढ यामुळे दळणाचे दर वाढवण्यात आल्याचे संघाने सांगितले आहे.संघाचे अध्यक्ष लुईस सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

यावेळी संघटनेचे सचिव प्रकाश कर्डिले, उपाध्यक्ष प्रेम राठोड, प्रमोद वाल्हेकर, खजिनदार गणेश गोरे, दिलीप ननावरे, अमोल मेमाणे, प्रवीण बारमुख आणि बाळू मुंगसे उपस्थित होते. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories