भोसरी विधानसभा मतदार संघातील नागरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांची आढावा बैठक

भोसरी विधानसभा मतदार संघातील नागरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांची आढावा बैठक

भोसरी विधानसभा मतदार संघातील नागरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांची आढावा बैठक 

पिंपरी, ता. १ ऑगस्ट  २०२६ -  भोसरी विधानसभा मतदार संघातील रस्ते, वाहतूक, अतिक्रमण, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन या विषयांवर आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या समवेत सविस्तर शनिवारी (ता. १) आढावा बैठक घेतली. विविध कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला महिनाभराची मुदत दिली आहे. 

यावेळी क-प्रभाग अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे, ई-प्रभाग अध्यक्षा अर्चना सस्ते, फ-प्रभाग अध्यक्षा शिवानी नरळे, ल-प्रभाग अध्यक्षा रेखा देवकर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, महापालिका, वाहतूक पोलीस विभागाचे सहायक पोलिस आयुक्त निलेश देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुढील कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत - * खड्डेमुक्त रस्ते आणि पदपथ, * वाहतूक कोंडीवर तातडीच्या उपाययोजना, * बीआरटी व डीपी रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहिम, * नो पार्किंग नियमांची कठोर अंमलबजावणी, * पीएमपीएमएल सेवा अधिक सक्षम आणि वेळेत, * मोशी दुर्घटनेनंतर कचरा व्यवस्थापन सुरळीत करण्यासाठी प्रभावी नियोजन, * अधिकारी कार्यालयात नव्हे, तर प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून काम करतील.

''प्रशासनाच्या केवळ बैठका नव्हे, तर प्रत्यक्ष कामे दिसली पाहिजेत. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ, वाहतूक कोंडीमुक्त आणि दर्जेदार नागरी सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही.'', असे आमदार लांडगे यांनी सांगितले.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories