लोकमान्य टिळकांना पुण्यतिथीनिमित्त शहर काँग्रेसकडून अभिवादन

लोकमान्य टिळकांना पुण्यतिथीनिमित्त शहर काँग्रेसकडून अभिवादन

लोकमान्य टिळकांना पुण्यतिथीनिमित्त शहर काँग्रेसकडून अभिवादन 

पिंपरी, ता. १ ऑगस्ट  २०२६ - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त शनिवारी (ता. १) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून निगडी स्मारकातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्यशैलीमुळे आक्रमकपणामुळे आणि जहाल मतवादी विचारांमुळे स्वातंत्र्यसंग्रामाला एक नवी गती मिळाली, दिशा मिळाली, ब्रिटिश सरकारने कायम त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून संबोधले. भर न्यायालयात या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे ठणकावून विचारत टिळकांनी आपला राष्ट्रवाद राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम प्रखरपणे परखडपणे व्यक्त केले होते. अन्याया विरोधातील राजवटीवर टिळकांच्या कार्यपद्धतीची आजच्या राजकीय सामाजिक परिस्थितीत सर्वसामान्यांना  आठवण होते आहे आणि त्या इतिहासातून प्रेरणा घेत आज अनेक नागरिक अन्याया विरोधात बंड करून उठत आहेत." 

या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवा दलाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, हरीश डोळस, भास्कर नारखेडे, गुंगा क्षीरसागर, गौरी नरसिंगे, कृष्णा जाधव, दीपक भंडारी आदी उपस्थित होते.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories