पवना धरणातून आज पाण्याचा मोठा विसर्ग नदीपात्रात सोडला जाणार, नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेची सूचना
Apr 29 2026
59
पवना धरणातून आज पाण्याचा मोठा विसर्ग नदीपात्रात सोडला जाणार, रावेत येथील नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेची सूचना
पिंपरी, ता. २९ - रावेत येथील नदीकाठच्या परिसरातील नागरीकांसाठी महत्वाची सूचना आहे. पवना उपविभागाच्या सूचनेनुसार आज, बुधवारी (ता. २९) पवना धरणाच्या सिंचन उपसा द्वारातून (Irrigation Outlet/Sluice) 400 क्युसेक विसर्ग क्षमतेने पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात येणार आहे.
त्याचबरोबर रावेत येथील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारीच्या सूचनेनुसार 8 दशलक्ष घनफूट (McFt) अतिरिक्त पाणी दुपारी २ वाजता जलविद्युत केंद्राच्या १००० हजार विसर्ग क्षमतेने पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात येणार आहे. नदीपात्रामधील एकूण विसर्गामुळे रावेत येथे नदीची पाणी पातळी अचानकपणे कमी किंवा जास्त होऊ शकते याची नदीकाठच्या नागरीकांनी नोंद घ्यावी, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.