पीएमआरडीए मुख्यालयात अण्णा भाऊ साठे यांना वंदन
पिंपरी, ता. १ ऑगस्ट २०२६ - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या आकुर्डी मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाच्या प्रेरणादायी विचारांना उजाळा देण्यात आला.
याप्रसंगी ‘पीएमआरडीए’चे माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरूषोत्तम सांगळे, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी तुषार बिडवे, दक्षता विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोडे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ भोसले आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.