रेडसन ऑर्गेनिक्स अँड वेलनेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य पदार्पण सोहळा उत्साहात संपन्न

रेडसन ऑर्गेनिक्स अँड वेलनेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य पदार्पण सोहळा उत्साहात संपन्न

रेडसन ऑर्गेनिक्स अँड वेलनेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य पदार्पण सोहळा उत्साहात संपन्न


चिंचवड | २५ ऑगस्ट २०२६ : रेडसन ऑर्गेनिक्स अँड वेलनेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य पदार्पण सोहळा उत्साहात संपन्न


रेडसन ऑर्गेनिक्स अँड वेलनेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या भव्य पदार्पण सोहळ्याचे आयोजन २५ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील एलप्रो मॉल सभागृहात करण्यात आले. उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री. संदीपसिंह हजारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राहुलजी बेरगळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री. अनिल माने, श्री. प्रमोद बेहेरा, श्री. मनीष जावळे, श्री. किरण काटकर, श्री सुमित चौधरी , श्री. रामदास पांढरे, श्री. विठ्ठल घुमरे, श्री. प्रशांत काटे आणि श्री. सचिन मोहिते , यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी रेडसन ऑरगॅनिक्स अँड वेलनेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या आयुष्मान मल्टी बेरी ज्यूस तसेच अल्कलाइन वॉटर जार या दोन महत्त्वपूर्ण उत्पादनांचे मान्यवरांच्या हस्ते भव्य अनावरण करण्यात आले. या अनावरण सोहळ्याला उपस्थित वितरकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रेडसनच्या नव्या वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह महाराष्ट्राबाहेरील विविध राज्यांतून कंपनीचे वितरक, सहयोगी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष ऊर्जा आणि उत्साह लाभला. या सोहळ्याच्या माध्यमातून रेडसन ऑर्गेनिक्स अँड वेलनेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या आगामी वाटचालीची दिशा, भविष्यातील उद्दिष्टे आणि विस्ताराच्या योजनांबाबत माहिती देण्यात आली. कंपनीच्या नेतृत्वाने रेडसनचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे रेडसन परिवारामध्ये नव्या उत्साहाची आणि सकारात्मक ऊर्जेची लहर निर्माण झाली. कंपनीच्या पुढील वाटचालीसाठी हा  सोहळा महत्त्वाचा टप्पा ठरला असून, रेडसनच्या उज्ज्वल भविष्यासाठी एका नव्या पर्वाची भव्य सुरुवात या कार्यक्रमातून झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories