खोली खाली करायला सांगितल्याच्या रागातून फरशी फेकून मारली

खोली खाली करायला सांगितल्याच्या रागातून फरशी फेकून मारली

खोली खाली करायला सांगितल्याच्या रागातून फरशी फेकून मारली  

पिंपरी, ता. २६ - भाडेतत्त्वावरील खोली खाली करायला सांगितल्याचा राग मनात धरुन २० वर्षीय युवकाने साथीदारांसह घरमालकाला फरशी फेकून मारुन जखमी केले. हा प्रकार देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नखाते कॉम्प्लेक्स येथे सोमवारी (ता. २५) मध्यरात्री १ वाजता घडला आहे. 

याबाबत, जखमी झालेले नवनाथ जगन्नाथ मोरे (वय ४५ वर्षे, रा. देहूगाव) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. आरोपी आदित्य डोलारे (वय २० वर्षे, रा. पाण्याच्या टाकीजवळ एम बी कॅम्प, देहूरोड) व त्याच्यासोबतच्या तीन अनोळखी इसमांवर सोमवारी (ता. २५) देहूरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहीता ११८ (१), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी मोरे हे नखाते कॉम्प्लेक्स या ठिकाणी कामावर होते.  आरोपीने यांनी दारु पिऊन तिथे येऊन मोरे यांना फरशी फेकून मारली, त्यात ते जखमी झाले. मोरे यांनी आरोपीस एक महिन्यापूर्वी भाडेतत्त्वावर दिलेली खोली करण्यास सांगितल्याचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादीस मारले.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories