news
clock
आरटीई प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया उद्यापासून सुरु होणार, १० मार्चपर्यंत मुदत

आरटीई प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया उद्यापासून सुरु होणार, १० मार्चपर्यंत मुदत

आरटीई प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया उद्यापासून सुरु होणार, १० मार्चपर्यंत मुदत 

पिंपरी, ता. १६ - राज्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना १७ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. अर्ज करण्यासाठी पालकांनी student.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ९ ते १९ जानेवारी दरम्यान शाळा नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर शाळा नोंदणी आणि पडताळणीसाठी २० ते २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. 

आता पुढच्या टप्प्यात, पालकांनी आपल्या पाल्यासाठी अर्ज करायचा आहे. पालकांना राहत्या घरापासून १ ते ३ किमी अंतरावरील जास्तीत जास्त १० शाळांची निवड करता येईल. त्यानंतर, लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड होईल व कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्चित होईल. 

---------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories