धारदार लोखंडी कोयता बाळगणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी, ता. २५ - तडीपार व घातक शस्त्र मनाई आदेशाचा भंग करुन धारदार लोखंडी कोयता बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखा युनिट - १ च्या पोलिसांनी आटोस्कीम-निगडी येथून ताब्यात घेतले आहे. रविवारी (ता. २४) आरोपीवर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुब चमन खान (वय २८ वर्षे, रा. संग्रामनगर झोपडपट्टी, अंकुश चौकाजवळ, ओटास्किम, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिस उप-आयुक्त परिमंडळ ०१ पिंपरी चिंचवड यांच्या तडीपार आदेशानुसार २ वर्षाकरीता तडीपार केले आहे. या तडीपार आदेशाचा भंग करुन आणि पिंपरी-चिंचवड पोलिस सह आयुक्तांच्या घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेशाचा भंग करुन स्वतःजवळ ३००/- रुपयांचा धारदार लोखंडी कोयता बाळगला होता.
आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर निगडी पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५, १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.