आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातील दानपेटीतील रक्कमेचा सेवेकऱ्यानेच केला अपहार

आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातील दानपेटीतील रक्कमेचा सेवेकऱ्यानेच केला अपहार

आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातील दानपेटीतील रक्कमेचा सेवेकऱ्यानेच केला अपहार 

पिंपरी, ता. २३ - आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातील दानपेटीतील रक्कम एका सेवेकऱ्यानेच विश्वासघात करुन लंपास केली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी रीतसर फिर्याद दिली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी देवाची येथील  ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातील चोरीचा हा गंभीर प्रकार 12, 13 आणि 16 मे 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत घडला आहे. मंदिरात सेवेकरी म्हणून कार्यरत असलेला विशाल बाळू वारुळे (वय 33) याच्याकडे दानपेटीतील रक्कम गोळा करून ती कॅशियरकडे जमा करण्याची अधिकृत जबाबदारी होती. मात्र, दानपेटीतील पैसे बकेटमध्ये भरत असताना, आरोपीने सुरक्षा रक्षक आणि इतरांची नजर चुकवून त्यातील काही रक्कम स्वतःजवळील पिशवीत टाकली.

आरोपी विशाल हा मंदिर परिसरातील फुलांचे हार ठेवण्याच्या ठिकाणी जायचा आणि तिथून ती रक्कम कॅशियरकडे जमा करण्यासाठी नेत असल्याचे भासवायचा. अशा प्रकारे त्याने तीन दिवसांत प्रत्येकी सुमारे 5 हजार रुपये, अशी एकूण 15 हजार रुपयांची रोकड चोरली आहे. ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे व चौकशीत समोर आली आहे. आळंदी पोलिस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत. या चोरीच्या घटनेमुळे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या कारभारावर टिका केली जात आहे. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories