गौरी-गणपतीत सोन्याचा हार चोरी; घरकाम करणाऱ्या महिलेला अटक

गौरी-गणपतीत सोन्याचा हार चोरी; घरकाम करणाऱ्या महिलेला अटक

शिरगाव | ३० सप्टेंबर २०२६ : गौरी-गणपती सणादरम्यान घरातील देवाला चढवलेला सोन्याचा हार चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा शिरगाव परंदवडी पोलिसांनी उलगडा केला आहे. या प्रकरणात घरकाम करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून चोरीला गेलेले ३०.५४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पेंडलसह, असा एकूण २ लाख ८४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी एका व्यक्तीने शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गौरी-गणपती सणानिमित्त घरातील देवाला चढवलेले ३०.५४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पेंडलसह चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २८०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने फिर्यादीच्या घरात घरकाम करणाऱ्या महिलेची चौकशी केली. पोलिसांनी तिच्या हालचाली आणि मानसिकतेचा अंदाज घेत कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर तिच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

या प्रकरणी गजरा सातप्पा कांबळे (वय ४५, रा. आकुर्डी, पुणे) हिला अटक करण्यात आली. तिला न्यायालयात हजर केले असता ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

तपासादरम्यान आरोपी महिलेकडून चोरीला गेलेले ३०.५४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पेंडलसह हस्तगत करण्यात आले. त्याची किंमत २ लाख ८४ हजार ८४७ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories