दादागिरी करत एका युवकाची ओळखीच्या युवकाला जबर लाकडी दांडक्याने जबर मारहाण

दादागिरी करत एका युवकाची ओळखीच्या युवकाला जबर लाकडी दांडक्याने जबर मारहाण

दादागिरी करत एका युवकाची ओळखीच्या युवकाला जबर लाकडी दांडक्याने जबर मारहाण

पिंपरी, ता. २३ - किरकोळ कारणाने दादागिरी करत एका युवकाने व त्याच्या साथीदारांनी दुसऱ्या युवकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. २१) मावळ तालुक्यात गहुंजे येथे घडली आहे. मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत, मारहाण झालेला युवक प्रेमराज केशव सोळंकी (वय २८ वर्षे, रा. साईनगर गहुंजे, तालुका मावळ) याने तक्रार दिली आहे.  आरोपी नागेश जगले (वय २७ वर्षे), अभिषेक जगले (वय २५ वर्षे) व  योगेश दडस (वय २५ वर्षे) यांनी प्रेमराजला मारहाण केली आहे. आरोपी नागेश हा प्रेमराजच्या ओळखीचा आहे. आरोपींनी पोलिसांनी अटक केली आहे. 

गुरुवारी (ता. २१) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास गहुंजे मैदानावर आरोपी नागेश याने फिर्यादी प्रेमराज याला ''इथे कोणी थांबू नका, लगेच मैदान खाली करा'', असे म्हणून शिवीगाळ केली. ''शिव्या का देत आहे'', असे प्रेमराजने विचारले असता नागेशने त्याला धक्का बुक्की केली. ''प्रेमराज त्याला तुझी तक्रार करीन'', असे म्हणाला तेव्हा नागेशने ''मी साईनगरचा भाई आहे, इकडे रहायचे असेल तर इज्जतीत रहा, मी एकाला पण जिवंत सोडणार नाही.'' असे म्हणून  हातातील लाकडी दांडके हवेत फिरवून दहशत पसरवली आणि याच दांडक्याने प्रेमराजला मारले.  हे दांडके तो डोक्यात घालत होता मात्र प्रहार चुकवला पण त्याच्या पाठीवर दांडक्याचा मार लागला. नागेशने प्रेमराजला ओरखडलेही आहे. नागेशच्या साथीदारांनी प्रेमराजला दगड फेकून मारले. प्रेमराजच्या आईलाही धक्काबुक्की केली आणि त्याच्या राहत्या घरासमोर येऊन त्यांना शिवीगाळ करुन त्यांच्या घराचे गेट तोडून नुकसान केले. 

तिन्ही आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २२)  भारतीय न्याय संहिता कलम ११०,३५२,३२४(४),३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories