news
clock
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी बंद, राज्य शासनाचे आदेश, प्रकल्पांची जबाबदारी महापालिकेकडे

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी बंद, राज्य शासनाचे आदेश, प्रकल्पांची जबाबदारी महापालिकेकडे

 पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी बंद, राज्य शासनाचे आदेश, प्रकल्पांची जबाबदारी महापालिकेकडे 

पिंपरी, ता. २१ - शहरात महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यासाठी नियुक्त केलेली पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी बंद करण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने मंगळवारी (ता. २१)  दिले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेले प्रकल्प व स्मार्ट सिटीच्या मालमत्तांचे हस्तांतरण महापालिकेकडे करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करावे असे या आदेशात नमूद केले आहे. कंपनीचे अध्यक्ष असलेले विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडील अधिकार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे दिले आहेत.

सन २०१७ मध्ये शहरात स्मार्ट सिटी योजनेची दिमाखात सुरवात झाली. पण, तब्बल नऊ वर्षांनंतरही  तब्बल एक हजार ३७८ कोटी ५६ लाख रुपयांचे प्रकल्प कंपनीकडून पूर्णत्वास गेले नाहीत. त्यामुळे कंपनी बंद केली जात आहे.  १३ मार्च २०२६ ला स्मार्ट सिटी कंपनीवर नव्या संचालक मंडळाची नियुक्ती झाली होती. महापौर रवी लांडगे, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नीलेश बारणे यांचा संचालक मंडळात समावेश होता. पण त्यांनी स्मार्ट सिटीच्या कामाला जोमाने सुरवात करण्याआधीच ही कंपनी बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. 

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या उपसचिव सुशिला पवार यांनी स्मार्ट सिटी कंपनी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे, आता स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हाती घेतले अपूर्ण प्रकल्प महापालिका कशा पद्धतीने पूर्ण करणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. 









Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories