माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांकडून अभिवादन
पिंपरी, ता. २२ जुलै २०२६ - माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आज बुधवारी (ता. २२) जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांनी अभिवादन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांची जयंती विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना आणि कार्याला उजाळा दिला.
कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कष्टकरी, कामगार बांधव,रिक्षाचालक, व फेरीवाला बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवंगत अजितदादा पवार यांनी राज्याच्या पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, कृषी, सहकार आणि शहरी विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विकासकामांतील निर्णयक्षमता, प्रशासनातील कार्यक्षमता आणि जनतेच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची त्यांची कार्यपद्धती विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी असेल, अशी भावना कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रमुख काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केली.
- महानगरपालिका शाळा, Municipal Schools, विद्यार्थी, Students, शिक्षक, Teachers, शैक्षणिक उपक्रम, Educational Activities, कष्टकरी संघर्ष महासंघ, Kashtakari Sangharsh Mahasangh
- पुष्पहार अर्पण, Floral Tribute, पिंपरी चिंचवड, Pimpri Chinchwad, PCMC
- जयंती, Jayanti, अभिवादन, Tribute
- अजितदादा पवार, Ajit Pawar, माजी उपमुख्यमंत्री, Former Deputy Chief Minister