वाकडमध्ये शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन ; तरुणावर गुन्हा दाखल

वाकडमध्ये शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन ; तरुणावर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. मात्र, हा आदेश लागू असताना लोखंडी तलवार बाळगल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वैभव भारत जाधव (वय २२, रा. ताथवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई श्रीकांत अंकुश जगताप यांनी तक्रार दिली आहे.

पोलीस सहआयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार, आयुक्तालयाच्या हद्दीत २८ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तलवारीसह शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येणारी शस्त्रे बरोबर नेण्यास बंदी लागू करण्यात आली आहे.  हा आदेश लागू असताना तलवार बाळगल्याचा आरोप जाधव याच्यावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (६ नोव्हेंबर) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास वाकडमधील दत्त मंदिर रस्त्यावरील ओमेगा पॅराडाईजच्या एल विंगसमोर जाधव हातात लोखंडी तलवार घेऊन फिरत असल्याचे आढळले. या तलवारीची किंमत ५०० रुपये असल्याची नोंद पोलिसांच्या प्रसिद्धिपत्रकात आहे.

याप्रकरणी शस्त्र अधिनियमाच्या कलम ४ व २५, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१), (३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस हवालदार धायगुडे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories