शहरातील युवा सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेना व युवासेनामध्ये जाहीर प्रवेश

शहरातील युवा सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेना व युवासेनामध्ये जाहीर प्रवेश

 शहरातील युवा सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेना व युवासेनामध्ये जाहीर प्रवेश

पुणे, ता. २५ - पिंपरी-चिंचवडमधील अनेक युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेना व युवासेनामध्ये जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे तसेच युवासेना प्रमुख पूर्वेस सरनाईक यांच्या कामाने प्रभावित होऊन त्यांनी नवीन पक्षप्रवेश केला आहे. 

मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना उपनेत्या व नगरसेविका सुलभाताई रामभाऊ उबाळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी युवानेते अजिंक्य उबाळे (युवासेना शिरूर लोकसभा अध्यक्ष), महेश डोके (शिवसेना शाखाप्रमुख व युवासेना भोसरी विधानसभा संपर्कप्रमुख), अमित शिंदे (युवासेना पुणे जिल्हा चिटणीस) आदी मान्यवर उपस्थित होते.

अनिश काळभोर (पिंपरी विधानसभा अध्यक्ष) व चांद पटेल (विभाग प्रमुख) यांच्या पुढाकाराने हा प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मूज्जमील भाई शेख (पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष), शाकीर भाई पठाण, अजहर सय्यद, अमीर नदाफ, इम्तियाज पटेल, सैफ अली खान, रिजवान शेख तसेच इतर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना व युवासेनामध्ये प्रवेश केला. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories