चाकणमध्ये कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन मारहाण आरोपींवर गुन्हा दाखल
Apr 27 2026
41
चाकणमध्ये कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन मारहाण आरोपींवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. २७ -चाकण येथील काळस ग्रामपंचायत जवळ रविवारी (ता. २६) रात्री १२:४१ च्या सुमारास एका व्यक्तीने कामाचे पैसे मागितल्यावर आरोपींनी त्याला लाथाबुक्यांनी, हॉकी स्टीकने मारहाण केली. यावेळी आरोपींनी फिर्यादी अक्षय किसन डुंबरे (वय २२, ड्रायव्हर) आणि शेखर गोरख पोटवडे यांच्यावर हल्ला केला.
फिर्यादी अक्षय डुंबरे यांच्या तक्रारीवरून चाकण पोलिसांनी आरोपींविरुद्ध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये अमोल आवटे, अजय बवले, निखिल खैरे, सत्यवान म्हसाडे आणि मारुती गव्हाणे यांचा समावेश असून अन्य २ ते ३ अनोळखी व्यक्ती आहेत. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
अक्षय डुंबरे यांनी बिलाच्या पैशांसाठी आरोपी सत्यवानकडे मागणी केली होती, त्यावर आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण केली. शेखर पोटवडे भांडणे सोडवण्यासाठी हस्तक्षेप करत असताना त्यालाही हॉकी स्टीकने मारहाण झाली, ज्यामुळे त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली.
फिर्यादीचे वडील थांबविण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्यांना फ्रॉन्स गाडीच्या बॉनेटवर घेवून १०० फुट पुढे घेतले, त्यामुळे त्यांना शारीरिक दुखापत झाली.
आरोपींवर चाकण उत्तर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), १८९ (२),१८९ (४),१९१ (२),११५ (२), ३५२, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.