पवना धरणातील गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ, खासदार श्रीरंग बारणे यांचा पुढाकार, गाळातून फुलेतय गुलाबाची शेती

पवना धरणातील गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ, खासदार श्रीरंग बारणे यांचा पुढाकार, गाळातून फुलेतय गुलाबाची शेती

पवना धरणातील गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ, खासदार श्रीरंग बारणे यांचा पुढाकार, गाळातून फुलेतय गुलाबाची शेती

पिंपरी, ता. २७ - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील गाळ काढण्याच्या कामाला रविवारी (ता. २७) सुरुवात झाली. हे महत्त्वपूर्ण काम खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसहभागातून हाती घेतले आहे. धरणाजवळ विधिवत पूजा करुन गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ झाला. गाळ काढल्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. 

यावेळी, खासदार बारणे म्हणाले, ''मी गेल्या १० वर्षांपासून शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता, केवळ लोकसहभागातून हे गाळ काढण्याचे काम सातत्याने सुरू ठेवले आहे, याचा मला विशेष आनंद आहे. यंदा देखील पवना धरणातील जास्तीत जास्त गाळ काढून पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, या उद्देशाने आज या कामाची सुरुवात करण्यात आली आहे.  लोकसहभागातून उभारलेले हे कार्य जलसंधारणासाठी  निश्चितच परिसरासाठी लाभदायक ठरणार आहे.''

मागील नऊ वर्षांपासून दरवर्षी उन्हाळ्यात पवना धरणातील गाळ काढला जातोय. आत्तापर्यंत ८५ हजार क्युबिक मीटर गाळ धरणातून काढला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही तीव्र पाणीटंचाई जाणवत नाही. पावसाळा सुरु होईपर्यंत गाळ काढण्याचे काम चालू राहणार आहे.

पवना धरणातील काढलेला गाळ मावळातील शेतकऱ्यांना निशुल्क दिला जातो. या पोयटा मातीतून मावळात गुलाबाची शेती फुलवली जाते आणि  मोठ्या प्रमाणात गुलाबाची जगभरात निर्यात केली जाते. गुलाबाच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने मावळातील फुलउत्पादक शेतकरी समाधानी आहेत, असे बारणे यांनी सांगितले. 

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडभोर, मावळ तालुका प्रमुख राम सावंत, उपतालुका प्रमुख अमित कुंभार, सोमनाथ कोंडे, मदनभाऊ शेडगे, युवासेना जिल्हा प्रमुख सागर पाचरणे, उपजिल्हा प्रमुख दत्ताभाऊ केदारी, कामशेत शहर प्रमुख सतीश इंगवले, भगवान भिकोले, माजी सरपंच लाला गोंते, माजी उपसरपंच काळूभाऊ उंबरकर, अक्षय उंबरकर, भगवान दरेकर, बाळासाहेब दरेकर, एकनाथ दरेकर, अमित मोरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories