लोकसभेत सध्याच्या जागांवर ३३ टक्के महिला आरक्षण तत्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसची निदर्शने
लोकसभेत सध्याच्या जागांवर ३३ टक्के महिला आरक्षण तत्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसची निदर्शने
पुणे, ता. २१ - लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागांवर ३३ टक्के महिला आरक्षण तत्काळ लागू करावे, या मागणीसाठी काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी रविवारी (ता. १९) दिल्लीतील भाजप मुख्यालयासमोर निदर्शने केली.
यावेळी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, महिला आरक्षण विधेयक २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून लागू करावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी सरकारकडे केली होती. तथापि अंमलबजावणीची वेळ नंतर जाहीर केली जाईल, असे सांगत विरोधकांना व देशवासीयांना ३० महिने अंधारात ठेवण्यात आले. त्यानंतर अचानक १६ एप्रिल रोजी आरक्षण लागू करण्याबाबतचा आदेश काढण्यात आला. राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवत महिला आरक्षण लांबवले जात आहे. महिला आरक्षणाचा विषय मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी जोडला गेला. विरोधकांनी तिन्ही विधेयकांना विरोधकांनी एकजुटीने विरोध केला. आता हेच लोक काँग्रेस महिला आरक्षणाच्या विरोधात असल्याचा गवगवा करत आहेत.
काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा, दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पुष्पा सिंह, पक्षाच्या प्रवक्त्या रागिनी नायक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
- देवेंद्र यादव, Devendra Yadav, अलका लांबा, Alka Lamba, पुष्पा सिंह, Pushpa Singh, रागिनी नायक, Ragini Nayak.
- Protest, दिल्ली, Delhi, ३३ टक्के आरक्षण, 33% Reservation,
- जयराम रमेश, Jairam Ramesh
- लोकसभा, Lok Sabha, महिला आरक्षण, Women Reservation, काँग्रेस, Congress,
- लोकसभा, लोकसभा निवडणूक, महिला आरक्षण, काँग्रेस