निगडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी सज्ज झालीये... अत्याधुनिक प्रयोगशाळा
निगडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी सज्ज झालीये... अत्याधुनिक प्रयोगशाळा
पिंपरी, ता. २१ - निगडी येथील क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. सोमवारी (ता. २०) या प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले.
या कार्यक्रमास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण पुणे विभागाचे सहसंचालक चंद्रशेखर ढेकणे, प्रादेशिक निरीक्षक किशोर उबाळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सूर्यवंशी, एक्साईड कंपनीचे प्रकल्पप्रमुख महेश भंगाळे, प्राचार्य शशिकांत साबळे, उपप्राचार्य अमर जाधव यांच्यासह डी. एन. गरदडे, एस. आर. खुडे, पी. टी. गवारी, व्ही. आर. भूमकर, जितेंद्र महाजन, सुनील धर्मे आदी उपस्थित होते. शशिकांत अहिवळे यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली पांडे यांनी आभार मानले.
ही प्रयोगशाळा चार महिन्यांत उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेमुळे इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या सुमारे ६० विद्यार्थी तसेच अल्पमुदतीच्या अभ्यास क्रमातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण मिळून परिसरातील उद्योगांच्या गरजेनुसार सक्षम मनुष्यबळ तयार होण्यास मदत होणार आहे.