news
clock
इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी ठेवल्याच्या कारणाने युवकावर कोयत्याने वार

इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी ठेवल्याच्या कारणाने युवकावर कोयत्याने वार

इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी ठेवल्याच्या कारणाने युवकावर कोयत्याने वार 

पिंपरी, ता. ७ -  इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी ठेवल्याबाबत विचारणा केल्याने दोन युवकांनी व दोन अल्पवयीन गुन्हेगारांनी एका युवकावर चक्क कोयत्याने वार केले. ही घटना माऊली चौक, वाकड येथे मंगळवारी (ता. ५) रात्री घडली आहे.

मारहाण झालेल्या युवकाच्या आईने तक्रार दिली आहे. या घटनेत  दत्तात्रेय उर्फ सोन्या रामेश्वर पांचाळ (वय १८ वर्षे, खाजगी नोकरी, रा.  थेरगाव, वाकड) व सुरज भुजबळ (वय २२ अंदाजे, राहणार वाकड) व दोन अल्पवयीन गुन्हेगार आरोपी आहेत. दत्तात्रेय पांचाळ याला अटक केली आहे व अल्पवयीन गुन्हेगारांना समजपत्र देऊन पालकांच्या ताब्यात दिले आहे.

फिर्यादी यांचा मुलगा उत्कर्ष आकाश जाधव याने एका आरोपीला  त्याने त्याचे इस्टाग्राम अकाउंटवर उत्कर्षला उद्देशून स्टोरी ठेवली होती.  उत्कर्षने त्याबाबत आरोपीला विचारणा केली. तेव्हा चारही आरोपींनी  उत्कर्षला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. हातातील कोयते हवेत फिरवुन परिसरात दहशतही निर्माण केली. 

या चारही आरोपींवर वाकड पोलिस ठाण्यात भा न्या सं २०२३ चेकलम १०९, ३ (५), क्रिमिनल अॅक्ट ३,७, आर्म अॅक्ट ४ (२५) प्रमाणे भादवि कलम ३०७, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories