मटका व जुगार अड्डे चालविणारा सराईत गुन्हेगार अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध
पिंपरी, ता. २१ - दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनहद्दीत बिनधास्तपणे मटका व जुगार अड्डे चालविणारा सराईत गुन्हेगार रफीक शगीर काझी याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द केले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हद्दीमध्ये मटका, जुगार चालविणाऱ्यां आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आरोपी रफीक शगीर काझी (वय ३९ वर्षे, रा. चाकण, ता. खेड) याच्यावर एकूण १८ गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे त्याच्या स्थानबध्दतेचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला पाठवण्यात आला होता. स्थानबध्द प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आरोपी रफीक शगीर काझी याच्याविरुध्द एम.पी.डी.ए. कायदयान्वये १ वर्षे कालावधीसाठी स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत.
रफीक काझीचा तांत्रिक विश्लेषण व गोपनिय बातमीदारामार्फत शोध घेवून शिताफीने ताब्यात घेऊन त्याला मंगळवारी (ता. २१) मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्यात केले आहे.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त - गुन्हे सारंग आवाड, अप्पर पोलीस आयुक्त प्रादेशिक बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त परिमंडळ - ४ श्वेता खेडकर, पोलीस उप आयुक्त - गुन्हे शिवाजी पवार, सहा पोलीस आयुक्त - गुन्हे विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त - महाळुंगे विभाग सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक - गुन्हे अनिल देवडे, सहा पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, श्रेणी पोलीस उप निरीक्षक चिंचकर, संतोष जगताप, नंदु तरटे, गणेश मापारी यांनी केली आहे.