news
clock
जेष्ठ वडीलांच्या सतर्कतेमुळे 'डिजीटल अरेस्ट'च्या सायबर फसवणुकीपासून बचावले दांपत्य

जेष्ठ वडीलांच्या सतर्कतेमुळे 'डिजीटल अरेस्ट'च्या सायबर फसवणुकीपासून बचावले दांपत्य

जेष्ठ वडीलांच्या सतर्कतेमुळे 'डिजीटल अरेस्ट'च्या सायबर फसवणुकीपासून बचावले दांपत्य

पिंपरी, ता. २१ - 'डिजीटल अरेस्ट'ची भिती दाखवल्याने निगडी येथील एक दांपत्य मोठ्या आर्थिक फसवणूकीला बळी पडणार होते. मात्र, या तरुणाच्या ज्येष्ठ वडीलांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे दांपत्य फसवणूकीपासून बचावले आहे. 

 निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणास रविवारी (ता. १९) सकाळी ११ च्या सुमारास व्हॉट्सअप कॉलव्दारे अज्ञात इसमाकडून संपर्क साधण्यात आला व समोरील व्यक्तीने तो मुंबई पोलीस क्राईम ब्रँच मधून बोलत असल्याचे सांगून तरुणास त्यांचे नावाचे पार्सल पकडण्यात आलेले असून त्या पार्सल मध्ये ५ वेगवेगळे पासपोर्ट तसेच मेफेड्रोन ड्रग्स मिळून आले आहेत, असे सांगितले. "तुम्हाला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीला सामोरे जावे लागेल" असेही सांगितले. त्यानंतर पिडीत तरुण व त्याची पत्नी यांना 'सिग्नल' हे अॅप डाऊनलोड करण्यास लावले व त्याव्दारे व्हिडीओ कॉल केला आणि फोनवर अधिकारी सांगत नाही तोवर कॉलसमोरुन जाता येणार नाही असे दरडावले.  थोड्या वेळाने पोलिस गणवेशातील बनावट अधिकाऱ्याने चौकशी करुन पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र देण्यात येईल असे दांपत्याला सांगितले. या पती-पत्नीला तुन्ही डिजीटली अरेस्ट आहात अशी भिती घातली व याबाबतीत कोणाला सांगू नका अशी धमकावले. 

आरोपींनी दोन दिवसांत 'सिग्नल' अॅपव्दारे व्हिडीओ कॉल करुन संबंधित तरुणाच्या बॅंक खात्याची आणि आधार क्रमांकाची माहिती घेतली होती आणि तरुणास बँक खात्यावर  पैसे पाठविण्यासाठी सांगितले होते. घाबरेल्या तरुणानेही म्युच्यूअल फंड मधून १२ लाख रुपये रक्कम काढण्याची तयारी केली होती व ही रक्कम जमा झाल्यावर ते सायबर गुन्हेगारांना पाठवून देणार होते. मात्र, याचवेळी ही गोष्ट तरुणाने आपल्या वडिलांना (वय ८१ वर्षे) सांगितली. ज्येष्ठ वडिलांनी लागलीच पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला व पोलीस अंमलदार सोपान बोधवड यांना या घटनेची माहिती दिली. 

अंमलदार सोपान बोधवड यांनी घटनेचे गांर्भीय ओळखून तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली. निगडी पोलिस ठाण्याचे पथक संबंधित तरुणाच्या घरी गेले व त्यांना डिजीटल अरेस्ट या फसवणुकीबाबत सविस्तर माहिती दिली आणि त्याना सायबर फसवणुकीपासून वाचवले. संबंधित कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले.

या घटनेमुळे पोलिसांनी नागरीकांना आवाहन केले आहे की, ''डिजीटल अरेस्ट अशी कोणतीही संकल्पना अस्तिवात नाही, कोणताही पोलीस अधिकारी व्हिडीओ कॉलव्दारे संपर्क साधून डिजीटल अरेस्ट करीत नाही. आपणास कोणत्याही अधिकारी यांचा चौकशीकामी व्हिडीओ कॉल आल्यास सदरच्या कॉलला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता जवळच्या पोलीस ठाणेस, सायबर पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड येथे किंवा डायल ११२ यावर संपर्क साधून माहिती कळविण्यात यावी. तसेच आपली सायबर फसवणुक झाल्यास १९३० या टोल फ्री क्रंमाकावर तक्रार नोंद करावी.''






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories