news
clock
शहरातील तीव्र पाणीटंचाईवरुन नगरसेविका श्रुती वाकडकर सर्वसाधारण सभेत आक्रमक

शहरातील तीव्र पाणीटंचाईवरुन नगरसेविका श्रुती वाकडकर सर्वसाधारण सभेत आक्रमक

शहरातील तीव्र पाणीटंचाईवरुन नगरसेविका श्रुती वाकडकर महापालिका सर्वसाधारण सभेत आक्रमक

पिंपरी, ता. ६ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मंगळवारी (ता. ५) झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील तीव्र पाणीटंचाई, विस्कळीत व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर नगरसेविका श्रुती वाकडकर यांनी प्रशासनाला जाब विचारत नागरिकांच्या समस्यांकडे ठामपणे लक्ष वेधले. कर भरूनही नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा का मिळत नाही ?, शहरातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने आणि अशुद्ध पाणीपुरवठा होण्यामागील कारणे काय आहेत?, टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर का येत आहे?, ‘पवना धरण बंद पाइपलाइन योजना’ अद्याप प्रलंबित का आहे ? असे प्रश्न श्रुतीताईंनी उपस्थित केले. 

सभेत बोलताना श्रुतीताईंनी स्पष्ट सांगितले की, ''प्रभाग क्रमांक २५ अंतर्गत वाकड, पुनावळे, ताथवडे तसेच शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना अत्यंत कमी दाबाने व अनेक वेळा अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे.'' महापालिकेला नियमितपणे कर भरुनही नागरिकांना मूलभूत गरज असलेले स्वच्छ व पुरेसे पाणी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.  अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना दर महिन्याला लाखो रुपये खर्च करुन टँकरने पाणी खरेदी करावे लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा टाकणारी आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता, पवना धरणातून थेट बंद पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. ही योजना तातडीने पुनरुज्जिवीत केल्यास पाणीगळती मोठ्या प्रमाणावर रोखता येईल तसेच नागरिकांना नियमित, शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा करता येईल, असे श्रुतीताईंनी नमूद केले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories