मोटार सायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक, एकूण १७.५० लाख रुपये किंमतीच्या २५ मोटार सायकल जप्त
मोटार सायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक, एकूण १७.५० लाख रुपये किंमतीच्या २५ मोटार सायकल जप्त
वाकड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाची कामगिरी
पिंपरी,ता. ४ ऑगस्ट २०२६ - वाकड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने मोटार सायकल चोरी करणाऱ्या तीन गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण १७.५० लाख रुपये किंमतीच्या २५ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत आणि एकूण १७ गुन्हे उघड झाले आहेत.
वाकड पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी वाकड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे निरीक्षण व तांत्रिक तपास केला. पोलिसांना मिळालेल्या बातमीवरुन आरोपी ज्ञानेश्वर शंकरराव जैसवाल (वय ४६ वर्षे, ड्रायव्हर, रा. आळंदी देवाची) याला १ ऑगस्टला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल व कौशल्यपूर्वक तपास करताना त्याने गेल्या दोन वर्षात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय व आजूबाजूच्या परिसरात अनेक मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या एकूण २३ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ज्ञानेश्वर जैसवाल हा खाजगी गाड्यांवर बदली चालक म्हणून काम करतो. तो मौज मजेसाठी गाड्या चोरायचा व मौज संपली की गाडी कुठेही लावायचा व दुसरी गाडी चोरायचा.
तसेच अन्य प्रकरणात वाकड तपास पथकाने २ ऑगस्टला आरोपी नामे वेदप्रकाश मदनसिंग रावत (वय ३७ वर्ष, रा. ताथवडे) याला अटक करुन त्याच्याकडून १ अॅक्टीव्हा मोपेड गाडी व आरोपी संतोष मोहन मांगिलवाड (वय २८ वर्ष, रा. वाकड) याला अटक करुन त्याच्याकडून १ ज्युपीटर मोपेड गाडी जप्त केलेली आहे.
सदर कामगिरी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, डॉ. शशीकांत महावरकर (पोलिस सह आयुक्त), सांरग आवाड (अपर पोलिस आयुक्त), बसवराज तेली (अपर पोलिस आयुक्त), प्रदिप जाथव (पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ - २), सुनिल कुराडे (सहाय्यक पोलिस आयुक्त, वाकड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख, श्रीनिवास दराडे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक मारणे, पोलीस अंमलदार दळे, पोलिस हवालदार वंदू गिरे, विजय भुसारे, मोहम्मद नदाफ, सचिन गायकवाड, विजय घाडगे, दिपक साबळे, विजय मोरे, पो.शि. कौतेंय खराडे, ज्ञानदेव झेंडे, विक्रम भगत, समाधान काबंळे, प्रमोद गायके, अभिषेक मांडे, कारभारी पालवे व मंगेश लोखंडे यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनिवास दराडे करत आहेत.