निगडीतील हॉटेलमध्ये पावभाजीत आढळली जिवंत अळी

निगडीतील हॉटेलमध्ये पावभाजीत आढळली जिवंत अळी

निगडीतील हॉटेलमध्ये पावभाजीत आढळली जिवंत अळी 

पिंपरी, ता. ४ ऑगस्ट २०२६ -  निगडीतील एका नामांकित हॉटेलमध्ये ग्राहकाला दिलेल्या पावभाजीत जिवंत अळी सापडली. हा प्रकार रविवारी (ता.२) घडला आहे. 

संबंधित ग्राहकाने व्हिडिओ अन्न व औषध प्रशासनाला पाठवला आहे. त्यानंतर संबंधित हॉटेलवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अन्न आणि औषध प्रशासन दिगंबर भोगावडे यांनी सांगतिले. 

रविवारी सुट्टी आणि फ्रेंडशिप डे असल्याने निगडीतील हॉटेलमध्ये गर्दी होती. एका ग्राहकाने पावभाजी मागवली. चार-पाच घास खाल्ल्यानंतर जिवंत अळी सापडली. त्यामुळे ग्राहकांचा संताप झाला. ग्राहकाने ही गोष्ट हॉटेल व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. 

पावसाळ्यामुळे भाज्यांमध्ये थोडा खराब माल येत आहे. सर्व भाज्या उकळून घेतल्या जातात. टॉमेटो किंवा काकडीमध्ये असलेली अळी ताटात पडली असेल, असे हॉटेलचे मालक जगदीश शेट्टी यांनी सांगितले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories