मोटारसायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या चौघांकडून ७ मोटार सायकली व २४ मोबाईल फोन जप्त, बावधन पोलिसांची कामगिरी

मोटारसायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या चौघांकडून ७ मोटार सायकली व २४ मोबाईल फोन जप्त, बावधन पोलिसांची कामगिरी

 मोटारसायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या चौघांकडून ७ मोटार सायकली व २४ मोबाईल फोन जप्त, बावधन पोलिसांची कामगिरी

पिंपरी, ता. ४ ऑगस्ट २०२६ - बावधन व हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या चौघांकडून ५ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या ७ मोटार सायकली व २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. ही कामगिरी बावधन पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने केली आहे. 

बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटार सायकल चोरीच्या घटनांचा तपास करताना म्हाळुंगे-नांदे रोडवर एक यूनिकॉर्न मोटार सायकलवर दोन इसम संशयीतरित्या जाताना दिसल्याने पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. परंतु, ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना थांबवून त्यांच्याकडे मोटारसायकलला नंबर प्लेट नसल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे, त्यांच्याबाबत संशय आल्याने पोलिसांनी त्यांना मोटार सायकलसह बावधन पोलिस ठाण्यात आणले. त्यापैकी एकाचे नाव अनिल लहु जाधव (वय २० वर्षे रा. म्हाळुंगे) असे असून एक अल्पवयीन गुन्हेगार आहे.  या दोघांनी त्यांच्या साथीदारांसह बावधन, हिंजवडी परिसरात मोटारसायकल व मोबाईलचोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. या दोघांचे साथीदार वसंत अंकुश जाधव (वय २५ वर्षे, रा. ता. मुळशी) व सुनिल लहू जाधव (वय २५ वर्षे, रा. ता. मुळशी) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  आरोपींकडून मोटारसायकल चोरीचे एकूण ७ गुन्हे उघड करत एकूण ५,३५,०००/- रुपये किंमतीच्या ७ मोटारसायकली व २४ मोबाईल फोन असा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, डॉ. शशीकांत महावरकर (पोलिस सह आयुक्त), बसवराज तेली (अपर पोलिस आयुक्त, प्रादेशिक विभाग), सारंग आवाड, (अपर पोलिस आयुक्त, गुन्हे), प्रदिप जाधव (पोलिस उप आयुक्त परिमंडळ - २), विठ्ठल कुबडे (सहाय्य पोलिस आयुक्त, हिंजवडी) विभाग यांचे मार्गदर्शनाखाली बावधन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, पोलिस निरीक्षक, गुन्हे परवेज शिकलगार, गुन्हे प्रकटीकरण पथक पोलिस उपनिरीक्षक सारंग ठाकरे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, सहाय्यक पोलिस फौजदार बापूसाहेब धुमाळ, पोलिस हवालदार अरुण नरळे, फारुक मुल्ला, नितीन चंदनशिव, महेश शिंदे, अतिश जाधव, पोलिस शिपाई दत्ता शिंदे, बाबासाहेब पोटे, स्वप्निल साबळे, अक्षय लाटे, ऋषीकेश पाटील, मंगेश लोखंडे (परिमंडळ -२ कार्यालय) यांनी केली आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories