रहाटणी-तापकीरनगर भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु
Feb 04 2026
74
रहाटणी-तापकीरनगर भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु
पिंपरी, ता. ४ - रहाटणी-तापकीरनगर भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. या परिसरातील पाणी पुरवठ्याची समस्या सोडवावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी या समस्येचा पाठपुरावा केला आहे. त्यानुसार, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश बरीदे, उपअभियंता हृषिकेश गेंगजे यांनी व्हॉल्व्ह तपासणी, जलवाहिनी दुरुस्ती आणि व्यवस्थापनाचे काम हाती घेतले. परिणामी शिवराज नगरात पाणी सुरळीत सुरू झाले आहे. तसेच शास्त्रीनगर, नखाते वस्ती, बळीराज कॉलनी, सिंहगड कॉलनी, राजगड कॉलनी, सज्जनगड कॉलनी आणि गावठाण भागातही लवकरच नियमित पुरवठा होणार आहे, अशी माहिती नगरसेवक बाबा त्रिभुवन यांनी दिली.
-----------------------------------------------------------------------------------------------