तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी २० ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी २० ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
पिंपरी, ता. ४ ऑगस्ट २०२६ - तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार - २०२५ साठी केंद्र शासनाच्या https://awards.gov.in या पोर्टलवर दिनांक २० ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे. साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातर्फे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
या पुरस्कारांतर्गत जमिनीवरील, समुद्रावरील आणि हवाई साहसी उपक्रमांसाठी प्रत्येकी एक पुरस्कार दिला जातो. तसेच साहसी क्षेत्रातील आजीवन योगदान यासाठीही स्वतंत्र पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या साहसी खेळाडूंची कामगिरी २०२३, २०२४ आणि २०२५ या तीन वर्षांतील असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कामगिरी जमीन, पाणी किंवा हवाई साहसी उपक्रमांमधील असून ती अतिउत्कृष्ट स्वरूपाची असावी.
- Online Application 2026
- क्रीडा मंत्रालय, Ministry of Youth Affairs and Sports, केंद्र शासन पुरस्कार, Central Government Award, क्रीडा पुरस्कार, Sports Awards India
- राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2025, National Adventure Award 2025, साहसी खेळाडू, Adventure Sports Players
- तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार, Tenzing Norgay National Adventure Award