सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीत होणार १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीत होणार १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीत होणार १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 

पुणे, ता. १५ - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित केले जाणार आहे. पुणे विद्यापीठात प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी रविवारी (ता. १५) पत्रकार परिषदेत दिली. 

सोमण यांनी सांगितले की,  शंभराव्या संमेलनासाठी महामंडळाच्या स्थळ निवड समितीने शनिवारी स. प. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या तीन ठिकाणांची पाहणी केली. विस्तीर्ण परिसर, अत्याधुनिक सुविधा, विविध कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सभागृहे, निवास व वाहनतळाची व्यवस्था या सुविधांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एकमताने निवड करण्यात आली. महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत संमेलनाचे स्थळ व तारखांची निश्चिती करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारे १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ४ दिवसांचे असेल.  २८ जानेवारी रोजी सायंकाळी संमेलनाचे उद्घाटन होणार असून, पुढील तीन दिवस भरगच्च साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शंभराव्या संमेलनात विशेष कार्यक्रम आणि भव्य ग्रंथप्रदर्शन असेल. महामंडळाची घटक संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद संमेलन आयोजित करणार असून पुस्तक महोत्सवाचे संयोज समर्थ युवा फाउंडेशन संयोजन करणार आहे. शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, उद्घाटक यांची निवड; तसेच संमेलनाची रूपरेषा साहित्य महामंडळाच्या पुढील बैठकांमध्ये ठरविण्यात येईल. हे संमेलन साहित्याची अभिरूची वाढवणारे असेल, असे योगेश सोमण यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला, साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे उपस्थित होते. 


 








Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories