अठरा वर्षीय युवकाकडून जिवतं काडतूसासह पिस्तूल जप्त

अठरा वर्षीय युवकाकडून जिवतं काडतूसासह पिस्तूल जप्त

अठरा वर्षीय युवकाकडून जिवतं काडतूसासह पिस्तूल जप्त 

पिंपरी, ता. २२ - विनापरवाना रुपये २७ हजार किंमतीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस पोलिसांनी १८ वर्षीय युवकाकडून जप्त केले आहे. या युवकाला अटक केली आहे.  थेरगाव परिसरात बुधवारी (ता. २१) ही कारवाई करण्यात आली. 

काळेवाडी पोलिस स्टेशनचे हवालदार स्वप्निल मारुती खेतले यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहीत दिनेश शिंदे (वय १८ वर्षे, रा. रमाबाई नगर, भाटनगर) याने बिगरपरवाना रुपये २७ हजार किंमतीचे पिस्तुल व एक जिवंत काडतूस बाळगले होते. त्याच्याविरोधात भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) (३) १३५ नुसार काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories