news
clock

भरधाव ट्रक अंगावरुन गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृ्त्यू 

पिंपरी, ता. १४ - भरधाव ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार खाली पडला आणि तोच ट्रक  अंगावरुन गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा भयानक अपघात पुणे-नाशिक महामार्गावर मोशीगाव चौकात शुक्रवारी (ता. १३) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

याबाबत, मरण पावलेल्या दुचाकीस्वार युवकाचा नातेवाईक गोविंद प्रकाश गायकवाड (वय ३३ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे.  अशोक लेयलॅन्ड कंपनीचा ट्रकचालक बिलाल अस्लम बारुदवाले (वय-२१ वर्षे,  रा. ता. निलंगा जि. लातुर) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे दाजी भगवान सिद्धार्थ साखरे (वय-२९ वर्षे रा. मोशी) हे त्यांच्या  घरातून खिरीड वस्ती मोशी येथून मोशी टोलनाका येथे त्यांच्या दुचाकीवर  कामानिमित्त येत होते. मोशी गाव चौक, पुणे नाशिक हायवे येथे चौकामध्ये पाठीमागून येणाऱ्या अशोक लेयलॅन्ड कंपनीच्या ट्रकचालकाने ट्रक भरधाव वेगाने चालवून सिद्धार्थ यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेत ते  रोडवर खाली पडले व ट्रकचे टायर त्यांचे पोटावरुन गेले. त्यामुळे सिद्धार्थच्या पोटातील आतडे बाहेर येऊन ते गंभीर जखमी होऊन  त्यांचा मृत्यू झाला. 

आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अटकेत आहे.


भरधाव ट्रक, दुचाकी अपघात, दुचाकीस्वार मृत्यू, पुणे-नाशिक महामार्ग, मोशीगाव चौक, ट्रक चालक अटकेत, अशोक लेयलॅन्ड ट्रक, बिलाल अस्लम बारुदवाले, सिद्धार्थ साखरे, गंभीर जखमी, आतडे बाहेर, गुन्हा दाखल, भारतीय न्याय संहिता 106(1), भारतीय न्याय संहिता 281, मोटार वाहन कायदा, Khirid Vasti, Moshi Tollnaka, Pune-Nashik Highway, truck accident, biker death, high-speed collision, truck ran over, police FIR, truck driver arrested, road accident, serious injury, intestines exposed, legal case, traffic violation, criminal case.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories