आळंदी | २९ सप्टेंबर २०२६ : कोणताही वैध परवाना नसताना पिस्तूल आणि जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस, असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याचे पोलिसांच्या नोंदीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई बाळासाहेब विष्णू खेडकर (वय ४६, नेमणूक युनिट ३, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. मोहम्मद शरीफ मोहम्मद जबेर मन्सुरी (वय २२, रा. आळंदी, मूळ रा.बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही कारवाई २७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास शिवम मोबाईल दुकानाशेजारी, पंचवटी दुकानात, पीसीएम चौक, आळंदी येथे करण्यात आली.
आरोपीच्या ताब्यात ५० हजार रुपये किमतीचे एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी २८ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजून ३७ मिनिटांनी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.